कोल्हापूर
ब्रँड कोल्हापूर मोठा झाला पाहिजे
कोल्हापूर हा अगदी इतिहास काळापासून ब्रँड आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांपासून,शिक्षणाच्या धोरणापासून ते केशवराव भोसले, खाशाबा जाधव, लता मंगेशकर अशा नामवंतांनीआणि त्यांच्या कामाने कोल्हापूर ला कायमच सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढेच ठेवले आहे. अवधूत गुप्ते जेव्हा जिथे जिथे जे जे भरपूर ते माझे कोल्हापूर ,अस म्हणतो तेव्हा त्या पाठीमागे या साऱ्या इतिहासाचा वारसा असतो. आणि, आपली आजची पिढी सुद्धा तितकीच तोडीस तोड आहे. जगात विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आपले आणि रूढार्थाने गावाचे नाव मोठे करत आहे. अशा यशोशिलेदारांचे विविध संस्था या ना त्या निमित्ताने छोट्या मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा करत असतात. पण हे यशोशिलेदार जेव्हा एखादी गोष्ट अचिव्ह करतात , तेव्हा ते प्रत्यक्षात गावाच नाव मोठं करत असतात. शेवटी एखाद्या गावाची आयडेंटिटी बनते ते कशामुळे? तर तिथल्या माणसांमुळेच!! त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून आजचा #ब्रँड_कोल्हापूर हा उपक्रम सुरू झाला.
आम्हाला तुमचा अभिमान आहे...!
खरतर ब्रँड कोल्हापूर ची सुरवात डिजिटल प्लॅटफॉर्म वरून झाली. आपल्या कोल्हापूर च्या कोणी काही यश मिळवले की मी माझ्या फेसबुक पेज वरून त्यांचे कौतुक करत असतो.
मग अशा सर्व कौतुकाच्या पोस्ट एकत्र व्हाव्यात, म्ह्णून त्याला काहीतरी टॅग असला पाहिजे असे वाटले आणि #ब्रँड_कोल्हापूर हा टॅग सुचला.
You must watch it
our recent videos
viewers said about our video
Testimonial
consetetur sadipscing elitr, sed diam nonumy eirmod tempor sadipscing invidunt ut labore.