2022

bkop-20220bn

हार्दिक अभिनंदन !

ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव 2022

डॉ. जयसिंगराव पवार

डॉ. जयसिंगराव पवार

महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक म्हणून आपला नावलौकिक आहे. 20 सामाजिक व साहित्यीक पुरस्कारांनी यापूर्वी आपला सन्मान झाला आहे. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करताना 40 संशोधनात्मक ग्रंथ व 45 शोधनिबंध आपण लिहीले आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास प्रबोधनीचे संस्थापक संचालक तसेच शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे आपण मानद संचालक आहात. मराठ्यांचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्र हे आपले संशोधन क्षेत्र आहे.

मा. श्री. भालचंद्र कुलकर्णी सर

मा. श्री. भालचंद्र कुलकर्णी सर

आपण आजपर्यंत जवळजवळ 250 हून अधिक चित्रपटांमध्ये चरित्र नायक खलनायक इत्यादी विविधरंगी भूमिका .एक गाव बारा भानगडी, सुगंधी कट्टा, दगा, कराव तसे भरावे, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, धूम धडाका या चित्रपटातील आपल्या भूमिका विशेष गाजल्या. आपण दुरितांचे तिमिर जावो सारख्या कौटुंबिक नाटकांमधून भूमिका तसेच लोकनाट्य सुद्धा गाजवून सोडली आहेत.आपल्या मी एक शिक्षक एक विदूषक या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आजपर्यंत जवळजवळ 1000 प्रयोग केले आहेत.

डॉ. सुनीलकुमार लवटे

डॉ. सुनीलकुमार लवटे

आयुष्यभर समर्पित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत होता.कोल्हापूरच्या 'रिमांड होम'चे बालकल्याण संकुलामध्ये रूपांतर करणे, 'समाजसेवा' त्रैमासिकाचे संपादन करणे अशा सेवाकार्यात आपला सहभाग होता. भारतीय शिष्टमंडळातून युरोप आशिया खंडातील १५ देशांचे अभ्यास दौरे यशस्वीपणे पार पाडून महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम्ससंबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रीकरण, संस्थांचा दर्जा सुधारणे, बालकांचा राष्ट्रीय कायदा व हक्कासंबंधी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य आपल्या हातून घडले. 

विशेष सत्कार - होस्ट ब्रँड कोल्हापूर

कस्तुरी सावेकर

कस्तुरी सावेकर

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने 8091 मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत मिळविला जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान.

शाहू तुषार माने

शाहू तुषार माने

दक्षिण कोरीया येथे झालेल्या नेमबाजी विश्वकरंडकात शाहू तुषार माने याने लक्ष्याचा अचूक वेध घेत दोन सुवर्णपदक जिंकत भारतासाठी मोलाची कामगिरी केली.

पंकज रावळू

पंकज रावळू

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत पंकज रवळू यांनी दुसऱ्यांदा हा किताब पटकाविला आहे. त्यांनी ही शर्यत 10 तास 7 मिनिटे 53 सेकंदात पूर्ण करुन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच फास्टेस्ट इंडियन आयर्नमॅन हा किताब पटकाविला आहे.

मुकेश तोतला

मुकेश तोतला

आयर्नमॅन नगरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी १३ जणांची भर पडली. या स्पर्धेत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग व ४२.२ किलोमीटर धावणे हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते.

वैष्णवी दत्तात्रय पाटील

वैष्णवी दत्तात्रय पाटील

इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई रग्बी सेव्हन एस या स्पर्धेसाठी वैष्णवी दत्तात्रय पाटील हिची भारतीय वरिष्ठ गट महिला संघामध्ये निवड झाली. याअगोदर तिने उझबेकिस्तान येथे झालेल्या १८ वर्षांखालील आशियाई रग्‍बी स्पर्धेत भारतीय संघातून प्रतिनिधित्व करत द्वितीय क्रमांक पटकावला होता.

स्वाती संजय शिंदे

स्वाती संजय शिंदे

बल्गेरिया (युरोप) येथे होणाऱ्या जागतीक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे. महिला गटात महाराष्ट्राची ती एकमेव कुस्तीगीर आहे.

ब्रँड कोल्हापूर 2022

ऐश्वर्या दयानंद जाधव

ऐश्वर्या दयानंद जाधव

थायलंडमधील नॉन्थाबुरी येथे झालेल्या आयटीएफ आशियाई 14 वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेत दुहेरी गटात विजेतेपदाला गवसणी घातली.इंग्लंड येथे झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात ऐश्वर्याने आशियाई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या संघात ती एकमेव भारतीय खेळाडू होती.

प्रज्वल चौगुले

प्रज्वल चौगुले

अँपल कंपनीने आयोजित केलेल्या 'शॉट ऑन आयफोन' या फोटोग्राफी स्पर्धेत जगातील लाखो फोटोग्राफरनी पाठविलेल्या फोटोमधून निवडलेल्या पहिल्या 10 फोटो मध्ये प्रज्वलच्या फोटोला नववा क्रमांक मिळालेला आहे. प्रज्वलने काढलेला फोटो अँपलच्या अधिकृत वेबसाईटवर फिचर केला जाणार आहे.

सचिन कुंभोजे आणि अंजोरी परांडेकर

सचिन कुंभोजे आणि अंजोरी परांडेकर

सचिन कुंभोजे आणि अंजोरी परांडेकर यांच्या सिरी एज्युटेक या स्टार्टअपने भारत क्रोएशिया स्टार्टअप चॅलेंज २०२२ जिंकले आहे. 'सिरी'ची 'डिसेन्ट वर्क फॉर इकॉनोमिक ग्रोथ 'साठी सर्वोत्कृष्ट प्रॉब्लेम स्टेटमेन्ट श्रेणीमध्ये निवड झाली आहे. भारत आणि क्रोएशियामधील ३०६ स्टार्टअप सहभागींमधून यांच्या स्टार्टअप्सची निवड झाली आहे.

तन्मय निनाद

तन्मय निनाद

युवा दिग्दर्शक तन्मय निनाद काळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ईक्षाणा लघुपटाने इंडियन फिल्म हाऊसच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बाजी मारत फिल्म ऑफ दि इयर च्या तृतीय पुरस्कारावर मोहोर उमटवली.

स्वप्निल तुकाराम माने

स्वप्निल तुकाराम माने

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेत 578 वा रँक मिळवीला आहे. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होऊनही त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती.

आशिष अशोक पाटील

आशिष अशोक पाटील

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेत 563 वा रँक मिळवीला आहे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या आशिष यांनी बांबवडे येथील गांधी विद्यालय येथे 10 वी चे शिक्षण घेतले.

अनिष गिरीश जोशी

अनिष गिरीश जोशी

यूपीएससी च्या वतीने मिनिस्ट्री ऑफ लेबर ॲन्ड एम्प्लॉयमेंट या खात्याकडील एम्प्लॉईज प्रॉव्हीडंट फंड विभागामध्ये एन्फोर्समेंट ऑफीसर / अकाऊंट ऑफीसर म्हणून निवड.

रमा पोतनीस

रमा पोतनीस

कोल्हापूर पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थिनी रमा पोतनीस हिची निवड हॉकी खेळाच्या 'एफआयएच' आंतरराष्ट्रीय पॅनल पंचपदी झाली आहे. यापूर्वी रमाने वेस्ट झोन सीबीएसई व अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे.

स्वप्नील कुसाळे

स्वप्नील कुसाळे

ग्रामस्वच्छता अभियानामुळे राज्यभर ओळख कमावलेल्या कांबळवाडी गावचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे या युवा नेमबाजाने बाकू विश्वकरंडक स्पर्धेत सलग तीन दिवसांत एका सुवर्णपदकासह दोन रौप्य पदकांची कमाई केली.

अभिजित दत्तात्रय त्रिपणकर

अभिजित दत्तात्रय त्रिपणकर

अभिजित दत्तात्रय त्रिपणकर यांची वर्ल्डकप कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून निवड झाली होती. कॅरम स्पर्धेत वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अभिजित कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू आहे.

पै. पृथ्वीराज पाटील

पै. पृथ्वीराज पाटील

कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत अंतिम सामन्यात विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. यापूर्वी त्यांने ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदक तर सिनअर वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेत सहभागी झाला होता.

वैभव नारायण पाटील

वैभव नारायण पाटील

जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने रोम (इटली) येथे आयोजित जागतिक कुस्ती स्पर्धेत वैभवने १७ वर्षांखालील ५५ किलो वजनी गटामध्ये फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. यापूर्वीही त्याची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती

नरसिंग रंगराव पाटील

नरसिंग रंगराव पाटील

किर्गीस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत नरसिंगने 17 वर्षाखालील 55 किलो वजनी गटामध्ये फ्रिस्टाईल प्रकारात ब्राँझ पदक, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दोन वेळा सुवर्ण मिळवीले आहे. हरियाना येथे झालेल्या खेलो इंडिया नॅशनल स्पर्धेत 51 किलो गटात सुवर्ण पदक मिळविले आहे.

सौरभ प्रभुदेसाई

सौरभ प्रभुदेसाई

बळी या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मराठी बेस्ट इडिटींग ने सन्मानित. अभिजित देशपांडे यांचे सोबत त्यांनी या फिल्मसाठी इडिटींग केले होते. कोरोनामुळे ही फिल्‍म ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाली. आत्तापर्यंत त्यांनी बकेट लिस्ट, न्यूड, चि व चिसौका, राजवाडे ॲन्ड सन्स या फिल्मसाठी को-इडिटर म्हणून काम केले आहे.

मुक्ता नार्वेकर

मुक्ता नार्वेकर

उदयोन्मुख Travel Vloger देशभरातून यूट्यूब कडून 20 यूट्यूब कंटेंट क्रिएटरची निवड 'YouTube Nextup Ambassador 2022' म्हणून निवड झाली आहे. पती रोहित आणि मुक्ता या मिळून यूट्यूब साठी कंटेंट क्रिएट करतात.

सुभाष पुरोहित

सुभाष पुरोहित

फार्मासिस्ट असलेले कोल्हापूरचे हौशी छायाचित्रकार सुभाष पुरोहित यांच्या छायाचित्राला इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा मेरिट पुरस्कार लाभला आहे. जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून इंग्लंडमधील फोटोग्राफी क्लबने जागतिक स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. जगभरातून १०,२०० छायाचित्रे स्पर्धेसाठी आली होती.

विरेन अभिजित पाटील

विरेन अभिजित पाटील

जॉर्डनमधील अमान शहरात झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षीय विरेन पाटीलने कास्यपदक पटकावीले. ११ वर्षांखालील गटात हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत जागतिक मानांकनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या लेबनॉनच्या मायकेल अबी नादेर याला पराभवाचा धक्का दिला.

निकिता सुनिल कमलाकर

निकिता सुनिल कमलाकर

निकिता कमलाकर हिने उझबेकिस्तान येथील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य व सुवर्णपदक पटकावले. यामध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले तर क्लिन अँड जर्कमध्ये ९५ किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्वही केले होते.

वेदांतिका संदीप माने

वेदांतिका संदीप माने

एआरएसईसी एशियाच्यावतीने थायलंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दोन रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. वेदांतिकाने आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि पातळीवर दोन विक्रमांसह नऊ सुवर्ण, सहा रौप्य व आठ कांस्यपदकांची कमाई केली आहे.

माहेश्वरी झुंजार सरनोबत - शेळके

माहेश्वरी झुंजार सरनोबत - शेळके

मेलबर्न (आस्ट्रेलिया) येथे झालेली अतिशय खडतर अशी आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा कोल्हापूरची सुपुत्री माहेश्वरी झुंजार सरनोबत - शेळके यांनी जिद्दीच्या जोरावर १८ व्या क्रमांकाने पूर्ण केली. 40 ते 44 या वयोगटातून त्यांनी सहभाग घेतला होता.

प्रमोद आबाजी पाटील

प्रमोद आबाजी पाटील

प्रमोद पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत ९० कि.मी. अंतर ९ तास ४० मिनिटांत पूर्ण करत रॉबर्ट मतशाली पदक मिळवले आहे. प्रमोद पाटील हे सध्या मंत्रालयातील शिक्षण विभागात अव्वर सचिवपदावर कार्यरत आहेत.

डॉ. किरण पवार

डॉ. किरण पवार

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत ९० कि.मी. अंतर 11 तास 51 मिनिटांत 11 सेकंदात पूर्ण केले आहे.

आर्यन नील पंडित-बावडेकर

आर्यन नील पंडित- बावडेकर

केर्न्स (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापुरातील २० वर्षीय आर्यन निल पंडित- बावडेकरने अद्वितीय कामगिरी केली. त्याने स्पर्धेचे ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे नियोजित अंतर केवळ १३ तास ३३ मिनिट २८ सेकंदात पूर्ण करत फुल आयर्नमॅनचा किताब पटकावला.

मंगेश चव्हाण

मंगेश चव्हाण

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

शैलेश तोतला

शैलेश तोतला

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

संजय सूर्यवंशी

संजय सूर्यवंशी

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

भारतवीरसिंह देवरा

भारतवीरसिंह देवरा

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

अतुल पाटील

अतुल पाटील

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

निलेश व्यवहारे

निलेश व्यवहारे

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

ओम कोरगावकर

ओम कोरगावकर

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

अशोक चौगुले

अशोक चौगुले

कझाकिस्तान येथे झालेल्या आशिया खंड आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १३ जणांनी 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी हजारो स्पर्धक सहभागी होतात.

प्रकाश मोरे

प्रकाश मोरे

डेन्मार्क येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत 'आयर्नमॅन'चा किताब पटकावला. या स्पर्धेत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग व ४२.२ किलोमीटर धावणे हे आव्हान १७ तासांच्या आत पूर्ण करावे लागते. मानसिक व शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी ही स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये आयोजित केली जाते.

जान्हवी जगदीश सावर्डेकर

जान्हवी जगदीश सावर्डेकर

इस्तंबुल (तुर्की) येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 69 किलो गटात स्कॉट, बेंचप्रेस व डेडलिफ या तिन्ही प्रकारात प्रत्येकी एक सुवर्णपदक आणि ओव्हरऑल एक सुवर्णपदक अशी चार सुवर्णपदके पटकावली.

शुभांगी शिवाजी पाटील

शुभांगी शिवाजी पाटील

इस्तंबुल (तुर्की) येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना ५२ किलो गटात ताकदीची चुणुक दाखवत स्कॉट, बेंचप्रेस व डेडलिफ या तिन्ही प्रकारात प्रत्येकी १ सुवर्ण व ओव्हरऑल मिळवून १ सुवर्ण अशी चार पदके मिळवली.

सोनल सुनिल सावंत

सोनल सुनिल सावंत

इस्तंबुल (तुर्की) येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना ५७ किलो गटात स्कॉट, बेंचप्रेस व डेडलिफ या तिन्ही प्रकारात प्रत्येकी रौप्यसह ओव्हरऑल मिळून १ रौप्य अशी चार पदके पटकावली.

ओंकार राजगोंडा वाणी

ओंकार राजगोंडा वाणी

इस्तंबुल (तुर्की) येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 69 किलो गटात स्कॉट, बेंचप्रेस व डेडलिफ या तिन्ही प्रकारात प्रत्येकी एक सुवर्णपदक आणि ओव्हरऑल एक सुवर्णपदक अशी चार सुवर्णपदके पटकावली.

सत्कारमूर्ती 2022

कविता चावला

कविता चावला

महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १४’ या शो मध्ये कविता चावला या या सिजनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत.

केदार कुलकर्णी

केदार कुलकर्णी

तरुण प्रयोगशील संगीतकार केदार कुलकर्णी यांनी संगीतबध्द केलेल्या खेंगाट चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली. यापूर्वी 'चंद्रलेखा' या लघुपटसाठी केदारला भालजी पेढारकर फिल्म फेस्टिव्हल कोल्हापूर यांचे सर्वोत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार मिळाला.

आनंद काळे

आनंद काळे

झी मराठी वरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेमधील विश्वजित या पात्रासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक व्यक्तीरेखा पुरुष हा पुरस्कार मिळविला आहे. आजपर्यंत जाडूबाई जोरात तसेच स्वराज्य रक्षक संभाजी मधील कोंडाजीबाबा फर्जद असे अत्यंत महत्वाचे रोल सुध्दा त्यांनी केले आहेत.

मदन माने

मदन माने

प्रवाह पिक्चर व स्टार प्रवाह या टीव्ही चॅनेलच्या वतीने प्रवार पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला.

श्रीया क्षीरसागर

श्रीया क्षीरसागर

नाशिक येथे झालेल्या भारतीय तलवारबाजी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ईपी सांघिक प्रकारात चमकदार कामगिरी करत तिने सुवर्णपदक पटकावले.

यश सबनीस

यश सबनीस

वेस्ट कोस्ट रायडर्स मिटतर्फे बुलेट क्लबसाठी आयोजित "रायडर मिट" या अनोख्या स्पर्धेत कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स या बुलेट ग्रुपने तीन प्रकारात बक्षीस पटकाविले.सिल्वासा, दिवदमन येथे आयोजित स्पर्धेत ६०० बुलेट स्वार वेगवेगळ्या राज्यातून सहभागी होते. टाइम ट्रायल या स्पर्धेत रॉयल राइडर्सच्या रायडरनी जबरदस्त यश मिळवले. संततधार पाऊस, चिखलयुक्त ट्रॅक यामुळे स्पर्धा पूर्ण करणे अवघड होती. रॉयल रायडर्सनी कौशल्यपणाला लावत ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.६५० सीसी क्लासमध्ये रायडर यश सबनीस यांनी पहिला क्रमांक पटकाविला.

महेश चौगुले

महेश चौगुले

दुसरा क्रमांक (५०० सीसी)

पार्थ अथणे

पार्थ अथणे

हिमालयन ४१० सीसी क्लासमध्ये - दुसरा क्रमांक

डॉ. आकाश बडे

डॉ. आकाश बडे

चौथा क्रमांक (३५० सीसी)

प्रा. एस. पी. गोविंदवार

प्रा. एस. पी. गोविंदवार

जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने ही यादीतयारकेलीआहे.शोधनिबंधांची संख्या व दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स एकच लेखक असणारे शोधनिबंध अशा काटेकोर निकषांवर ही यादी केली जाते.

प्रा. हेमराज यादव

प्रा. हेमराज यादव

जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीचजाहीर केली आहे. यातशिवाजीविद्यापीठाच्या संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने ही यादी तयार केली आहे. शोधनिबंधांची संख्या व दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा,शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स एकच लेखक असणारे शोधनिबंध अशा काटेकोर निकषांवर ही यादी केली जाते.

डॉ. सचिन ओतारी

डॉ. सचिन ओतारी

जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीचजाहीर केली आहे. यातशिवाजीविद्यापीठाच्या संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने ही यादी तयार केली आहे. शोधनिबंधांची संख्या व दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा,शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स एकच लेखक असणारे शोधनिबंध अशा काटेकोर निकषांवर ही यादी केली जाते.

प्रा. तुकाराम डोंगळे

प्रा. तुकाराम डोंगळे

जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना मानांकन प्राप्तझालेआहे.यानिमित्तानेकोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने ही यादी तयार केली आहे. शोधनिबंधांची संख्या व दर्जा, संशोधनपत्रिकेचादर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स एकच लेखक असणारे शोधनिबंध अशा काटेकोर निकषांवर ही यादी केली जाते.

डॉ. एस. ए. व्हनाळकर

डॉ. एस. ए. व्हनाळकर

श्री मौनी विद्यापीठ संचलित कर्मवीर हिरे महाविद्यालयात कार्यरत असणारे डॉ. व्हनाळकर यांचा समावेश झाला आहे. त्यांना भौतिकशास्त्र आणि नॅनो तंत्रज्ञान या क्षेत्रातील कार्याच्या आधारावर यादीत स्थान मिळाले आहे.

इशिका चेतन डावरे

इशिका चेतन डावरे

दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी सात वर्षांच्या इशिका चेतन डावरे या चिमुकलीने डोळ्यांवर काळी पट्टी बांधून ३२ किलोमीटर अंतर स्केटिंग करून अवघ्या तीन तास दहा मिनिटांत पूर्ण करुन विश्वविक्रम केला. महाराष्ट्रात अशा प्रकारचा विक्रम करणारी इशिका ही पहिलीच स्केटर आहे.

अनुष्का कविराज रोकडे

अनुष्का कविराज रोकडे

सांगली ते कोल्हापूर असे 50 कि.मी. स्केटींग करुन नवीन विक्रम केला आहे. तिच्या या कार्याची दखल नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.