2021

DSC04971

हार्दिक अभिनंदन !

ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव 2021

प्रा. एन. डी. पाटील

प्रा. एन. डी. पाटील

सहकार, शिक्षण तसेच राजकीय क्षेत्रामध्ये अजोड कामगिरी करत असताना शेतकरी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरुन त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या या अमूल्य आणि अजोड कार्यासाठी ‘ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

डॉ. जे. एफ. पाटील

डॉ. जे. एफ. पाटील

अर्थशास्त्रासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्यांनाही सोपा करुन सांगीतला. शिवाजी विद्यापीठ व सामाजिक संस्था तद्वतच शासकीय विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपण आपल्या कार्याचा ठसा आपण उमटवला. आपण महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होता, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

श्री. बिभिषण पाटील

श्री. बिभिषण पाटील

कोल्हापूरात वेटलिफ्टींग आणि पॉवरलिफ्टींग क्रीडा प्रकार रुजवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक खेळाडू त्यांनी घडविले. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल ‘ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

विशेष सत्कार - होस्ट ब्रँड कोल्हापूर

तेजस्विनी सावंत

तेजस्विनी सावंत

आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू, ऑलंपिक साठी निवड

अनिकेत जाधव

अनिकेत जाधव

कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव यांची २३ वर्षाखालील भारतीय संघात आघाडीचा खेळाडू म्हणून निवड

राही सरनोबत

राही सरनोबत

आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू, ऑलंपिक साठी निवड

अनुजा पाटील

अनुजा पाटील

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू. महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून निवड

ब्रँड कोल्हापूर 2021

सुनिल निगवेकर - कला दिग्दर्शक

सुनिल निगवेकर

 'आनंदी गोपाळ' मराठी चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक' म्हणून श्री. सुनील निगवेकर यांना भारत सरकारच्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रणव भोपळे - फुटबॉल

प्रणव भोपळे

फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये कोल्हापुरातील वडणगे गावातील प्रणव भोपळे याने दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रणवने 'लोंगेस्ट टाइम बॅलन्सिंग या फुटबॉल ऑन नी' या प्रकारात ०४ मिनिटे २७ सेकंद फुटबॉल बॅलेन्स करत पहिला जागतिक विक्रम नोंदविला आहे.

आनंद पाटील

आनंद पाटील

लहानपणापासूनच अल्पदृष्टी असल्याने डोळ्यांना अक्षरे निट दिसत नव्हती, बोर्डवरील अक्षरे वाचता येत नव्हती. त्यामुळे मॅग्नीफायरचा वापर करुन अक्षरे वाचलित. या सर्व प्रतिकुल परिस्थितीत तब्बल 14, 15 तास अभ्यास करुन यूपीएससी परीक्षेत देशात 325 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होवून आपण लखलखीत यश मिळविले.

सोनाली नवांगूळ

सोनाली नवांगूळ

अपंगत्वावर जिद्दीने विजय मिळवून आपण साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. आत्तापर्यंत तीन स्वतंत्र पुस्तके त्याचबरोबर चार पुस्तकांचे अनुवादही केले आहे. आपण अनुवादीत केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या कादंबरीला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

कस्तुरी सावेकर

कस्तुरी सावेकर

वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षापासून डोंगर दऱ्यांना जवळ करत आत्तार्पंत 137 ट्रेक्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्याबरोबरच अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीमध्ये जगातील आठव्या क्रमांकाचे २६,७४१ फूट उंचीचे माऊंट मनास्लू शिखर आपण यशस्वीरित्या सर केले. 

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून चहा, कॉफी वगैरे पेय घेतल्यानंतर होणारा कचरा टाळण्यासाठी कागदी व प्लास्टिक कपचा पर्याय म्हणून कोल्हापूरमध्ये प्रथमच खाण्यायोग्य बिस्कीट कप बनविण्यात आले आहेत. 

सुभाष पुजारी

सुभाष पुजारी

कॉन्स्टेबल ते एपीआय हा प्रवास अत्यंत कष्टाने आपण पूर्ण केलात. पोलीस खात्यातील नोकरी सांभाळून दिवसाला 6 तासाहून अधिक वेळ व्यायाम करुन शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ‘मास्टर भारत श्री २०२१’ हा किताब आपण मिळविला. असा किताब मिळविणारे भारतातील पहिले पोलीस अधिकारी होण्याचा सन्मान आपणास प्राप्त झाला आहे.

शशांक पवार - युवा संगीतकार

शशांक पवार

जोतिबा रोडवरील 'राधाई स्टुडिओ'च्या माध्यमातून अनेक संगितरचना करुन कोल्हापूरच्या संगीत परंपरेला आपण समृद्ध केले. कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी बीग एफएम च्या बीग मराठी एंटरटेनमेंट ॲवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट शिर्षक गीत म्हणून आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला.

वैष्णवी पाटील

वैष्णवी पाटील

पाडळी खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात आपण वाढलात. रग्बी सारख्या खेळामध्ये नैपुण्य मिळवत तीन राज्यस्तरीय आणि एका शालेय राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार यश मिळविले. या जोरावर ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आणि या संघाने सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

अनुज जमदग्नी

अनुज जमदग्नी

हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्ने, युनिव्हर्सल, टेस्टमेड, बझफिड या सारख्या नामांकित प्रोडक्शन कंपनीमध्ये इडिटर म्हणून आपण काम करत आहात. लॉस एंजिल्समध्ये स्वत:चा स्टार्टअप सुरु करुन लोकल आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी आपण कमर्शीयल्स आणि जाहीराती बनविण्याचे काम करत आहात.

पवनकुमार जोंग

पवनकुमार जोंग

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या भारतीय वनसेवा परीक्षेत (IFS) राज्यात प्रथम तर देशात सहावा क्रमांक पटकाविला.

सुहास चव्हाण

सुहास चव्हाण

तीन वेळा आपल्याला यशाने हुलकावणी दिली पण जिद्द आणि अभ्यासातील सातत्य, स्वयं-अध्ययनाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या भारतीय वनसेवा परीक्षेत (IFS) देशात अकरावा क्रमांक पटकाविला.

अर्थव कदम

अर्थव कदम

ऑनलाईन प्रशिक्षण आणि अवघ्या चार तासांच्या प्रयत्नातून आपण बनविलेल्या सर्वात कमी आकाराच्या उपग्रहाने रामेश्वरम येथून अंतराळात यशस्वी झेप घेतली. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुकसह गिनीज़ वर्ल्ड रेकॉर्ड बुकनेही घेतली.

स्वरूप उन्हाळकर

स्वरूप उन्हाळकर

घरची प्रतिकूल परिस्थिती असून आई सविता उन्हाळकर या आर. के. नगरातील गणेश मंदिराजवळ अगरबत्ती व बांगड्या विकून उदरनिर्वाह करतात. जन्मापासून पायांनी पोलिओग्रस्त असुनही आपण पाच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पॅरा स्पर्धा गाजविल्या आहेत. महाराष्ट्र शासनानेही आपणास शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे.

अश्विन भोसले

अश्विन भोसले

स्वत: क्रिकेटर, ॲथलिट आणि जिमनॅस्टीक खेळाडू. आंतरराष्ट्रीय स्तरावर तायक्वांदो मध्ये 1 सिलव्हर तर राष्ट्रीय स्तरावर 23 मेडल्स. ऑस्ट्रीया येथे झालेल्या 18 आयर्न मॅन ॲवॉर्ड विजेत्यांचे कोच तसेच फिटनेससाठी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना मार्गदर्शन

विकास खोडके

विकास खोडके

भोपाळ, मध्यप्रदेश येथे आयोजित केलेल्या १८ व्या राष्ट्रीय कनिष्ठ मैदान अजिंक्यपद स्पर्धेतील ११० मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थावित केला आहे.

सत्कारमूर्ती 2021

सुप्रिया कुसाळे

सुप्रिया कुसाळे

राजाराम महाविद्याल येथे शिकत असताना असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी (नवी दिल्ली) आयोजित अन्वेषण या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत आपण संशोधन केलेल्या सेंद्रिय खतास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.

अमोल आळवेकर

अमोल आळवेकर

कोल्हापुरातील संभाजीनगर आगारात एसटी कंडक्टर म्हणून काम करताना गिर्यारोहणाचा छंद आपण जोपासला आहात. जीवधनजवळील वानर लिंगी, जुन्नर नाणे घाट येथील खडा पारसी, माळशेज घाटातील माळशेज लिंगी, फंट्या, सांगनोरे हे चार सुळके एकाच मोहिमेत सर केले आहेत.

डॉ. गजानन राशिनकर

डॉ. गजानन राशिनकर

ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांच्या कर्करोगावर सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या फेरोसीफेन औषधाचे यशस्वी संशोधन आपण केले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या संशोधनाचे पेटंट प्रमाणपत्र आपल्याला दिले आहे.

डॉ. प्रकाश बनसोडे

डॉ. प्रकाश बनसोडे

ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांच्या कर्करोगावर सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या फेरोसीफेन औषधाचे यशस्वी संशोधन आपण केले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या संशोधनाचे पेटंट प्रमाणपत्र आपल्याला दिले आहे.

दत्तात्रय कदम

दत्तात्रय कदम

गृहनिर्माण विभागात लिपीक म्हणून कार्यरत असून फाईल वरील सुंदर हस्ताक्षराबद्दल मा. मुख्यमंत्री यांच्याकडून विशेष कौतुक.

ऋषिकेश मांगुरे

ऋषिकेश मांगुरे

सिव्हील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करुन घरच्या शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय आपण घेतलात. पीएमईजीपी या स्टार्टअप योजनेतून कर्ज व अनुदान मिळवून गावातील स्वत:च्या शेतात फॅक्टरी उभी केली.

पल्लवी यादव

पल्लवी यादव

'पेट्रोलियम इंजिनिअर असून सुध्दा आपण आयुष्यात वेगवेगळी चॅलेंजीस स्विकारली आहेत. पोवायए या संस्थेची गंबाल इंडिया एन्डुरन्स ही 60 तासांच्या आत विनाथांबा कन्याकुमारी ते आग्रा अशी तीन हजार किलोमिटरची कार शर्यत पूर्ण केली.

डॉ. सुप्रिया पाटील

डॉ. सुप्रिया पाटील

नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारीत आपल्या संशोधनाची दखल घेवून अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाने जाहीर केलेल्या ए. डी. सायन्टेफिक इंडेक्स या यादीत आपला समावेश केला आहे.

डॉ. मयूर नंदीकर

डॉ. मयूर नंदीकर

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागातच आढळणाऱ्या केना कुळातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध आपण लावलात. या संदर्भातील संशोधनपर लेख न्यू यॉर्कच्या ब्रिटोनीया विज्ञान ग्रंथात प्रसिध्द झाला आहे.

निधी लालवाणी

निधी लालवाणी

सीए फाऊंडेशन परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविला. देशभरातून परीक्षेसाठी बसलेल्या 78 हजार विद्यार्थ्यांमध्ये आपण 400 पैकी 361 गुण मिळवत हे यश प्राप्त केले.

रजत पोवार

रजत पोवार

इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत भारतात पहिला येण्याचा मान मिळविला. तरुण वयात आपण हे यश प्राप्त केले आहे. टॅक्सेशन क्षेत्रात होणाऱ्या बदलांना सतत सामोरे जात आंतरराष्ट्रीय कर प्रणालीचा अभ्यास आपण करुन हे यश मिळविले आहे.

पद्मश्री बागडेकर

पद्मश्री बागडेकर

भरतनाट्यम मधील विशारद ही पदवी आपण मिळविली. विवाहानंतर तब्बल सात वर्षाच्या काळानंतर आपण पुन्हा पायात घुंगरू चडविले आणि वयाच्या चाळीशीत 'अलंकार' पदवी मिळवून इतिहास रचला.

डॉ. केशव राजपूरे (पदार्थ विज्ञान)

डॉ. केशव राजपूरे (पदार्थ विज्ञान)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील सार्वकालिन कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. ए. व्ही. राव (पदार्थ विज्ञान)

डॉ. ए. व्ही. राव (पदार्थ विज्ञान)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील सार्वकालिन कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. सी.एच. भोसले (पदार्थ विज्ञान)

डॉ. सी.एच. भोसले (पदार्थ विज्ञान)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील सार्वकालिन कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. ज्योती जाधव (जैव रसायनशास्त्र)

डॉ. ज्योती जाधव (जैव रसायनशास्त्र)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील सार्वकालिन कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. ए. व्ही. मोहोळकर (पदार्थ विज्ञान)

डॉ. ए. व्ही. मोहोळकर (पदार्थ विज्ञान)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील वार्षिक कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. संजय लठ्ठे (नॅनो सायन्स)

डॉ. संजय लठ्ठे (नॅनो सायन्स)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील वार्षिक कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनो सायन्स)

डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनो सायन्स)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील वार्षिक कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

डॉ. के.एम. गरडकर (रसायनशास्त्र)

डॉ. के.एम. गरडकर (रसायनशास्त्र)

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील वार्षिक कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

गायत्री पटेल

गायत्री पटेल

व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून सुध्दा महिलांमध्ये प्रवासाची आवड निर्माण होण्यासाठी वन ड्रीम वन राईड मोहिमेत भारतातील २८ राज्ये, आठ केंद्र शासित प्रदेश आणि १८ जागतिक वारसास्थळांना भेटी देत १८० दिवसात ३० हजार किलोमीटरचा प्रवास टू व्हीलर वरुन पूर्ण केलात.

अक्षरा माने

अक्षरा माने

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली असून संशोधनातील सार्वकालिन कामगिरीवर आधारित सूचीमध्ये आपला समावेश आहे.

अनोज्ञा गावडे

अनोज्ञा गावडे

वर्ल्ड कप, टी 20, टेस्ट क्रिकेट, वन डे व आयपीएल स्पर्धेतील विविध विश्वविक्रम 4 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ केल्यामुळे एशिया बुक ऑफ रेकॉर्डने ग्रँड मास्टरचा किताब बहाल केला आहे.   रेकॉर्ड यासह 15 रेकॉर्ड बुक मध्ये घेतलेला आहे.

अश्विनी काणेकर

अश्विनी काणेकर

बौध्दीक कौशल्याचा कस पाहणाऱ्या गेट परिक्षेत टेक्स्टाईल विभागात आपण देशात अव्वल क्रमांक मिळविलात. या परीक्षेसाठी देशातील साडेसात लाख इंजिनिअरींगचे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

अभिर गोखले

अभिर गोखले

संपूर्ण देशात बास्केटबॉल हँडलिंगमध्ये सर्वात वेगवान ठरत 'फास्टेस्ट बॉल हँडलर ऑफ इंडिया' हा किताब आपण पटकावला. 36 सेकंदामध्ये विविध ड्रिबलिंगचे प्रकार आपण सादर केले.

ऐश्वर्या जाधव

ऐश्वर्या जाधव

ऑल इंडिया चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या एकेरी आणि दुहेरी प्रकारात विजेतेपदाचा दुहेरी मुकूट आपण पटकावला.

संदेश कुरळे

संदेश कुरळे

इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. वडीलांची साथ प्रबळ इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर आपली वाटचाल सूरु आहे. विशेष म्हणजे आपल्या सरावासाठी वडीलांनी चक्क कर्ज काढून आपल्या शेतातच लॉन टेनिस कोर्टची उभारणी केली आहे.

ध्रुव बोराटे

ध्रुव बोराटे

वयाच्या अवघ्या १३ वर्षी जबरदस्त इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर सिक्कीम येथील 'झोंगरी टॉप' हा ट्रेक आपण पूर्ण केला आहात. 12 हजार फूट उंचीचे हे बरफाछादीत शिखर पूर्ण करुन आपण गिर्यारोहणातील आपले कौशल्य सिध्द केले आहे.

स्वप्नील कुसाळे

स्वप्नील कुसाळे

दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक-२०२१ स्पर्धेमध्ये ५० मी. ३ पोझिशन मिश्र (पुरुष) प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

अन्नपूर्णा कांबळे

अन्नपूर्णा कांबळे

बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत १०० मी. बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, १०० मी फ्री स्टाईल प्रकारात रौप्य आणि १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कास्य अशा तीन पदकांची कमाई.

सानिका जाधव

सानिका जाधव

जयपूर येथे झालेल्या ऑल इंडिया यूथ गेम चॅम्पियनशिप स्पर्धेत १६०० मी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. आवळी खुर्द सारख्या खेड्यात राहून कठोर परिश्रम आणि राणावनात धावण्याचा सराव करुन अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत.

प्रशांत जोशी

प्रशांत जोशी

प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीने दररोज एक ऑनलाईन गायन मैफील सादर करुन दररोज एका गरजू व्यक्तीस अल्पसा आधार देताना विश्वविक्रमी सांगेतिक उपक्रम आपण राबवित आहात. सलग 937 दिवसात सलग 1018 संगीत मैफीली स्थानिक कलाकारांच्या सहभागातून पूर्ण केल्या आहेत.

सौरभ सालपे

सौरभ सालपे

लखनौ येथे होणाऱ्या आर्मी चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी आपली निवड झाली.
सुब्रोतो मुख्रजी इंटरनॅशनल , राज्य स्तरीय,राज्य व राष्ट्रीय शालेय स्तरावरील स्पर्धा, ४४ व्या साउथ कोरिया येथील १८ वर्षा खालील आंतर राष्ट्रीय स्पर्धाअशा नामांकित स्पर्धदरम्यान यशस्वी कामगिरी बजावली.

आदित्य उबाळे

आदित्य उबाळे

इजिप्त मधील वर्ल्ड किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड. किकबॉक्सींग स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सुवर्णपदक.

प्रविणसिंह कोळी

प्रविणसिंह कोळी

श्रीनगर येथे झालेल्या आईस स्टॉक राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. ऑस्ट्रीया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशीप स्पर्धेसाठी निवड.

क्रिश मलकेकर

क्रिश मलकेकर

नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशिप स्पर्धेमध्ये 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक. आजअखेर विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत 6 सुवर्ण तर 1 रौप्य पदाची कमाई

सुहानी पाटील

सुहानी पाटील

मुंबई आणि बेंगलोर येथे झालेल्या टीव्हीएस नॅशनल रेसमध्ये वमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी अंतिम १६ निवड झाली आहे. बाईक रेसिंगमध्ये अंतिम फेरीत सहभागी होणारी एकमेव कोल्हापूरकर.

संकेत तायशेटे

संकेत तायशेटे

रोहतक, हरियाणा येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले

यश जाधव-नाईक

यश जाधव-नाईक

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेत कास्य पदक.

आदेश रुकडीकर

आदेश रुकडीकर

दिल्ली येथील झालेल्या ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ दि डेफ स्विमिंग स्पर्धेत ३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई केली आहे.

श्वेता चिकोडे

श्वेता चिकोडे

भोपाळ, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या १८ व्या अथेलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत 400 मिटर हर्डल्स प्रकारात महिला गटात रौप्य पदक पटकाविले.

रोहन कांबळे

रोहन कांबळे

भोपाळ, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या १८ व्या अथेलेटिक्स फेडरेशन स्पर्धेत 400 मिटर हर्डल्स प्रकारात पुरुष गटात कास्यपदक पटकाविले.

सुनील कोनेवाडकर

सुनील कोनेवाडकर

भारतीय पॉवरलिफ्टींग फेडरेशनतर्फे तामिळनाडू येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार सुवर्णपदक पटकावत सर्वाधिक वजन उचलण्याचे नवीन रेकॉर्ड केले. यापूर्वी हाँगकाँग येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.

विश्व तांबे

विश्व तांबे

इंदोर येथे झालेल्या पॅरा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण पदक.

विवेक मोरे

विवेक मोरे

इंदोर येथे झालेल्या पॅरा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक

दत्तप्रसाद चौगुले

दत्तप्रसाद चौगुले

इंदोर येथे झालेल्या पॅरा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक

अर्थव पाटील

अर्थव पाटील

बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत १०० मी बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण पदक तर ५० मी फ्री स्टाईल प्रकारात कास्य पदक मिळविले.

सोनाली सावंत

सोनाली सावंत

गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळविले.

जान्हवी सावर्डेकर

जान्हवी सावर्डेकर

गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बेंच प्रकारात रौप्य पदक, स्कॉट प्रकारात कास्य पदक मिळविले.