2020
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
कु. डॉ. केदार विजय साळुंखे
चि. डॉ. अर्थव संदीप गोंधळी
वयाच्या ५ व्यावर्षांपासून तायक्वांदो, सायकलिंग ट्रायथोलोन, कुडो अशा विविध प्रकारात २३ पारितोषिके मिळविली आहेत, वयाच्या १२ व्या वर्षी तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट पदवी व सायकलिंग च्या विविध स्पर्धेंमध्ये जागतिक विक्रम ३० नोव्हेंबर २०१९ करून सलग १२ तास २९६ किमी सायकलिंग करून नवीन ६ जागतिक विक्रम केले.
कु. पूजा दानोळे
आसाम राज्यातील गुवाहाटी येथे चालू असलेल्या 'खेळो इंडिया युथ गेम्स' मध्ये यंदाच्या पर्वापासून समावेश करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात १७ वर्षाखालील गटात १५ कि. मी. रोड रेस शर्यतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील कु. पूजा दानोळे हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
अभिनेत्री उषा जाधव
इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया या मानाच्या महोत्सवामध्ये "माई घाट: क्राईम नं. 103/2005" या चित्रपटातील व्यक्तीरेखेसाठी कोल्हापूरच्या अभिनेत्री उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान.
सागर नलावडे
गेली १० वर्ष सह्याद्री भटकंती, दुर्गसंवर्धन, समाजकार्य यामध्ये कार्यरत असलेल्या शिलेदार सागर नलावडे यांनी गिर्यारोहण क्षेत्रात विक्रमांची मालिका यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. सर्वात पहिला विक्रम १६.४०मिनिटात लिंगाणा सुळका आरोहण सोलो विनासाहित्य करून २१ मार्च २०१९ ला केला. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०१९ रोजी रशिया मधील सर्वोच्च शिखर माउंटएल्ब्रुस सर केले.यानंतर ६ महिन्यातच त्यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो २६जानेवारी २०२०रोजी यशस्वीपणे सर करून तिसरा विक्रम केला,युरोप खंडातील रशिया मधील सर्वात उंच माऊंटएलब्रूसशिखर (5642meter) ते सुद्धा अवघ्या 7 तासांत ह्याची नोंद इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड.
विक्रम कुऱ्हाडे
पंजाब (जालंधर) येथील राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, ९ वरिष्ठ गट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग , २०१३, २०१४ साली खाशाबा जाधव स्पर्धेत सुवर्णपदक , २०१६ साली सिंगापूर राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक , २०१६ साली राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक , २०१६ साली शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित , २०१९ इराणमधील आतंरराष्ट्रीय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड.
डॉ. पल्लवी मूग
श्रीलंकेतील कोलोम्बो येथे पार पडलेल्या रिले स्पर्धेत डॉ. पल्लवी मूग यांनी ४००,८००, आणि १५०० मी स्पर्धेत सुवर्ण पदकांची कामगिरी सोबतच १ रौप्य पदक पटकावले. याचसोबत त्यांना बेस्ट अथेलिस्ट इंडियन वूमन अशी ट्रॉफी देखील यावेळी प्रदान करण्यात आली.
डॉ. अतिश दाभोलकर
आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिक संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी नियुक्ती.
अजिंक्य दीक्षित
"पहिला ड्रोन मेकर", त्याने बनवलेला "सारथी"नावाचा रोबोट "रोबोट बॉर्न इन कोल्हापूर विथ सोल फॉर्म टेक महिंद्रा' अशा उल्लेखाने जर्मनीतील कंपनीला देण्यात आला.
आरती दत्तात्रय पाटील
कोलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत २५ किमी गटातून कांस्यपदकाची कमाई. मुंबई मॅरेथॉन मध्ये कस्टम विभागातर्फे २१ किमी गटात द्वितीय क्रमांक.
किशोर पुरेकर
अमेरिकेतील पोट्रेट सोसायटी तर्फे वतीने दिला जाणारा 'सिग्नेचर स्टेटस' हा सन्मान मिळविणारे भारतातील पहिले शिल्पकार
रिया पाटील
गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय जुनिअर अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत स्प्रिंट १००० मिस्डले प्रकारात दोन सुवर्ण. १६ वर्षांखालील मुलींच्या २०० मी एक रौप्यपदक
उज्ज्वल शिवाजी चव्हाण
दिव्यांग असुन ही राज्य , राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत ४१ पदकांची कमाई, ३ वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
सम्मेद शेटे
मलेशिया पिनांग हेरिटेज सिटी इंटरनॅशल खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत 'आंतरराष्ट्रीय मास्टर' खिताब' मिळवला . कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी
मधुरा गणेश बाटे
अखिल भरायटीय सांस्कृतिक संघ, ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चरva युनिस्को यांच्या वतीने सिंगापूर येथे आयोजित ९ व्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई